संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून हिंदी आणि इंग्रजीमध्ये बजेट जाणून घेता येणार आहे.



केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्य जनतेला या अर्थसंकल्पाची माहिती घेता यावी यासाठी आता केंद्र सरकारने एक मोबाईल अ‍ॅप लॉन्च केलं आहे. त्या माध्यमातून इंग्रजी आणि हिंदी भाषेत या अर्थसंकल्पाची माहिती मिळणार आहे.



या अ‍ॅपचं नाव युनियन बजेट मोबाईल अ‍ॅप असं आहे. अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.



संसदेत अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर लगेच या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत अर्थसंकल्पाची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे लोकांना आपल्या आवडत्या भाषेत अर्थसंकल्प समजावून घेता येणार आहे.



केंद्र सरकारच्या या अ‍ॅपचं नाव युनियन बजेट मोबाईल अ‍ॅप (Union Budget Mobile App) असं आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पासंबंधी सर्वात विश्वसनिय माहिती घेता येऊ शकेल.



युनियन बजेट मोबाईल अ‍ॅप हे http://indiabudget.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येऊ शकेल. तसेच गुगल प्ले स्टोअरवरुनही हे अ‍ॅप डाऊनलोड करता येऊ शकेल.