सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलावातील मासे मृत झाले आहे



मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येऊन मृत माशांचा खच पडला आहे



संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाला आहे



धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे 450 ते 500 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली



मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजले नाही



धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते



परंतु आता तलावात आणि काठावर लाखो मासे मरुन पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे



काळसे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण काळसे गावात दवंडी पिटण्यात आली



नागरिकांना नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे




पाण्याचा पर्याय नसल्यास पाणी निर्जंतुक करुन वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे