आंबा एक मधुर आणि रसाळ फळ आहे जे उन्हाळ्यात खाल्ल्याशिवाय कोणी चुकवूच शकत नाही. आंबा केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असल्याने आपल्या वजन कमी करण्यासाठी आंबा देखील चांगला असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. हे हार्मोन्सचे नियमन करण्यात आणि पीएमएस कमी करण्यास मदत करते. आंब्याचा रससुद्धा तुम्ही करून पिऊ शकता. हा रससुद्धा खूप फायदेशीर आणि चविष्ट आहे. आंब्याचा रसही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. आंब्यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. आंब्यामध्ये आहारातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते जे आपले पचन निरोगी ठेवण्यास मदत करते.