सकाळच्या वेळी जीरा पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे. सकाळच्या वेळी जीरा पाणी प्यायल्याने पचनासंबंधी त्रास दूर होण्यास सुरुवात होते. उपाशी पोटी जीरा पाणी घेतल्याने पोट फुगने आणि अपचन सारख्या त्रासातून दिलासा मिळतो. जिऱ्यात थर्मोजेनिक घटक असतो. यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. वजन घटवण्यासाठी सकाळच्या वेळी जीरा पाणी मदतशीर ठरू शकते. नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करण्यासाठी जीरा पाणी फायदेशीर आहे. सकाळी जीरा पाणी घेतल्याने पोट काही प्रमाणात भरते. त्यामुळे अधिक खाणं टाळलं जातं. जीरा पाण्यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.