कॅन्सर आजाराची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. शरीरातील इतर भागांत पसरल्यावर कॅन्सरची लक्षणे जाणवतात. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे.



शरीरातील ट्यूमर (Tumor) म्हणजे गाठी दोन प्रकारच्या असतात. एक कॅन्सरची आणि दुसरी नॉन कॅन्सर



शरीरातील एखाद्या भागात पेशींची अनियंत्रित वाढ होऊन त्याची गाठ तयार होते.



हा ट्यूमर किंवा ही गाठ कॅन्सरची आहे की नॉन कॅन्सर आहे, यामधील फरक चाचणी अर्थात बायोप्सी केल्यानंतरच समोर येतो.



ट्यूमर किंवा गाठी शरीरातील कोणत्याही भागात तयार होऊ शकतात.



कॅन्सर आजाराबाबतची मुख्य बाब म्हणजे कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे फार अवघड असते.



जेव्हा कॅन्सर शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याची लक्षणे तीव्र गतीने जाणवतात. यावेळी कॅन्सर झाल्याचं समोर येतं.



असाच एक कर्करोग आहे, जो सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर



धुम्रपान करणे हा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण आहे



कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामधील फुफ्फुसांचा कॅन्सर सायलेंट किलर म्हणजे संथ गतीने पसरणारा अतिशय धोकादायक प्रकार असल्याचं डॉक्टराचं मत आहे.



डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाच्या पेशींमधील ट्यूमर तयार होतो, तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असं म्हणतात.



फुफ्फुसाचा कर्करोग माणसाला हळूहळू मारतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. हा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान.



फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास व्यक्ती दीर्घकाळ आयुष्य जगू शकतो.