तुरटीचा वापर पुरुष दाढी करताना करतात, पण या तुरटीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत, ते जाणून घ्या
तुरटी त्वचेसंदर्भातील अनेक आजारांवर गुणकारी आहे. तुरटीचा वापर करुन तुम्ही त्वचेवरील मुरुमांपासून सुटका मिळवू शकता.
तुरटीचा वापर करून तुम्ही तुमचं सौंदर्य वाढवू शकता. यामुळे तुमच्या त्वचा सुंदर आणि मुलायम होईल.
यासाठी तुरटी घेऊन त्याची पावडर बनवा. ही पावडर पाण्यात मिसळून घ्या. या पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करा.
तुम्ही अंघोळीच्या पाण्यातही तुरटी मिसळून तुम्ही या पाण्याता वापर करु शकता. या पाण्याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर होईल.
तुरटीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. यामुळे पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होईल. यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.
त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही तुम्ही तुरटीचा वापर करु शकता.
एक चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा तुरटीची पावडर यात गुलाब पाणी किंवा दूध मिसळून पॅक तयार करुन घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे ठेवा.
यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ कपड्याने पुसून कोरडा करा आणि यावर टोनर आणि मॉइश्चरायजर लावा.
यामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि तजेलदार होईल.
तुरटीचा वापर करुन तुम्ही त्वचेवरील डाग दूर करू शकता. यासाठी एका वाटीत तुरटीची पावडर घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर डाग असलेल्या ठिकाणी लावून मसाज करा.