साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झालं.



काल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बछडा खेळताना दिसला.



बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली.



वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली.



डा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. परंतु ती थेट इथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही.



कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली.



मध्यरात्रीच्या सुमारास एका आईचं आणि तिच्या पिल्लाची भेट झाली.



मादी बिबट्या कुठेच न दिसल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते.



त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली.