साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोझा काल हटविण्यात आलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी एसी यंत्रणा बसवली आहे.

वातानुकूलित यंत्रणेचे साहित्य मंदिराच्या छतावर साडेपाच टनांचे आऊट डोअर आणि इतर साहित्य होते.

मात्र या बोजामुळे आणि जुन्या सामग्रीमुळं मंदिराला धोका होऊ नये यासाठी तो हटवण्याचा निर्णय घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायात यांनी याबाबत आदेश दिले.

आदेश दिल्यानंतर हे सर्व साहित्य अन्य ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे.

या साहित्यासह छतावर असणारे शेकडो किलोचे साहित्य आता हटविण्यात आले आहे.

यामुळं शिर्डी मंदिराच्या छतानं मोकळा श्वास घेतला आहे.

कित्येक वर्षांपासून हे साहित्य छतावर पडून होते.