छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.



आज सिद्धार्थचा पहिला स्मृतिदिन आहे.



2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.



सिद्धार्थनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं बिग बॉस, खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर यांसारख्या स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेऊन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं.



सिद्धार्थचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



12 डिसेंबर 1980 रोजी सिद्धार्थचा जन्म झाला.



'बाबुल का आंगन छूटे ना से' या 2008 मधील मालिकेमधून सिद्धार्थनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



'ये अजनबी और लव यू जिंदगी', 'बालिका वधू', 'झलक दिखला जा', 'अजनबी', 'सीआईडी आणि 'पवित्र रिश्ता' यांसारख्या मालिकांमध्ये सिद्धार्थनं काम केलं.



'बिग बॉस 13' या कार्यक्रमाचा सिद्धार्थ विजेता ठरला. या कार्यक्रमामधील सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



सिद्धार्थ हा फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचा. त्याच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले होते.