सिद्धार्थ आणि कियारा यांचे नुकतेच ग्रँड रिसेप्शन पार पडले.
कियारा आणि सिद्धार्थने रिसेप्शनसाठी खास लूक केला होता. कियाराने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस, स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता. तर सिद्धार्थने ऑल ब्लँक लूक केला होता.
कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शनला आलिया भट्ट आणि नीतू सिंह यांनी हजेरी लावली.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनसाठी आलियाने खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटची साडी, न्यूड मेक-अप असा लूक आलियानं सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनसाठी केला होता.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी 'रणबीर कुठंय?' असा प्रश्न विचारला.
रिपोर्टनुसार, आलिया आणि सिद्धार्थ हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनला आलियाने हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
काजोल आणि अजय देवगन यांनी देखील कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
सोशळ मीडियाच्या माध्यमातून अनेक जण सिद्धार्थ आणि कियाराला शुभेच्छा देत आहेत.