अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ग्लॅमरस फोटोंमुळेही भूमी बऱ्याचदा चर्चेत येत असते. भूमी पेडणेकरने नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला हजेरी लावली. रिसेप्शनसाठी भूमीने नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता. या ड्रेसमुळे भूमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. रिस्पेशनमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. भूमीने डीप नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता. एका युजर्सने म्हटलं आहे की, भूमीने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे. काहीतरी वेगळं घालत जा, असं एका युजर्सने म्हटलं आहे. भूमीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अटाऊंटवर शेअर केले आहेत.