बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील आऊटफिट मनीष मल्होत्रांनी डिझाईन केले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी राजस्थानातील जैसलमेरमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कुटुंबियांसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करण जौहर, मनीष मल्होत्रा, अश्विनी यार्डीसह अनेक सेलिब्रिटी कियारा-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. हळद, मेहेंदी, संगीत सोहळ्याला येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ अखेर लग्नबंधनात अडकणार असल्याने त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत.