बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आज वाढदिवस आहे.

'बॉलिवूडचा भिडू' अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जॅकी श्रॉफने आपल्या करिअरच्या टप्प्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

जॅकीने 1973 साली 'हीरा पन्ना' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले.

जॅकी श्रॉफने आजवर 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

नव्वदच्या दशकातील सुपरहिट अभिनेत्यांच्या यादीत जॅकी श्रॉफची गणना होते.

सौदागर', 'राम लखन', 'रंगीला', 'बॉर्डर', 'रुप की राणी चोरों का राजा' असे अनेक सुपरहिट सिनेमे जॅकीने बॉलिवूडला दिले आहेत.

जॅकी आज एक लोकप्रिय अभिनेता असला तरी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

जॅकी श्रॉफने हिंदीसह, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे.

जॅकीचा 'कोटेशन गँग' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.