बटाटा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाणारी ही सर्वात महत्त्वाची भाजी आहे.
मोठ्या प्रमाणात बटाटा खाल्ल्याने तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते.
बटाट्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याकारणाने तुम्ही जर याचे जास्त सेवन केले तर गुडघेदुखी होऊ शकते.
ज्या लोकांना मधूमेह आहे त्या लोकांनी बटाट्याचे सेवन मुळीच करू नये. नाहीतर मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो.
बटाट्याऐवजी कमी कॅलरी असलेले पदार्थ खाल्ले तर तुमचे वजन नियंत्रणात राहते.
जास्त प्रमाणात बटाटा खाल्ल्याने ब्लडप्रेशर मोठ्य प्रमाणात वाढू शकते.
बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडीटी होऊ शकते.
डॉक्टर असा सल्ला देतात की गरोदर महिलांनी बटाट्याचे जास्त सेवन करू नये आणि विशेषतः त्यांनी कच्च्या बटाट्याचे सेवन टाळावे.
जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्यास तुमचे वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
कोलेस्ट्राॅलची समस्या देखील निर्माण होऊ शकते.