बरेच लोक पावसाळ्याची वाट पाहत असतात, कारण हा ऋतू कडक उन्हानंतर येतो. यामुळे अनेक लोकांना कडक उन्हापासून आराम मिळतो.
मात्र पावसात भिजणे चांगले की वाईट हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे.
पावसाच्या पाण्यात अंघोळ करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते, कारण हे पाणी सहसा शुद्ध असते.
मनाला खूप शांती मिळते ज्यामुळे तणाव आणि नैराश्य दूर होते. पावसाचे थेंब मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
दिवसभर काम करून थकल्यानंतर किंवा दु:खात असाल तर पावसात भिजावे. यामुळे तुम्हाला बरे वाटू शकते.