लहान मुलांची उंची वाढवण्याकरता पालक मोठी काळजी घेत असातात. त्याकरता ते त्यांना अनेक प्रकारचे व्यायाम करण्याकरता प्रोत्साहीत करतात.
काही मुलांची उंची खूप पटपट वाढते. मात्र अनेक मुलांची उंची वाढवण्याकरता खूप प्रयत्न केला तरीही त्यांची उंची वाढत नाही.
तुमच्या मुलाची उंची वाढत नसेल तर त्यांना पौष्टिक पदार्थ खायला द्या. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही त्यांना खायला देऊ शकता.
मुलांना नियमीत अंडे खायला द्या.अंड्यापासून तयार केलेल्या अनेक पदार्थ त्यांना खायला द्या.
तसेच त्यांना दही खायला द्या.त्यात असणारे प्रो-बायोटिक्स पचन चांगले करण्यास मदत करते.दह्यात असणारे कॅल्शियम हाडे मजबूत करतात.
मुलांना रोज सकाळ - संध्याकाळ दूध प्यायला देणे गरजेचे आहे. ज्यामुळे उंची वाढू शकते.
सोयाबीनमध्ये असणारे प्रोटीन तुमची उंची वाढवण्याकरता फायदेशीर आहे. त्यामुळे आहारात सोयाबीनचा समावेश करणे गरजेचे आहे.
मुलांना दररोज व्यायाम करण्याकरता प्रोत्साहीत करा. रोज त्यांना मैदानी खेळ खेळण्याकरता आग्रह करा.
मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्याकरता त्यांना पुरेशी झोप मिळते आहे का? याकडे संपूर्ण लक्ष द्यावे.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. यासाठी मुलांना योगा करायला लावा.