तुमचे मन निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयींमध्ये या गोष्टींचा समावेश करा.
आजच्या फास्ट फॉरवर्ड जीवनात आपले मन सतत विचलित होत असते. वाढत्या कामाचा ताणामुळे स्वत:ला ताजेतवाणे ठेवणे खूप गरजेचे असते.
जर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मानसिक थकवा जाणवतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मात्र येणाऱ्या या मानसिक थकव्याकरता सोपे उपाय केल्यास तुम्हाला चांगले वाटू शकते.
ध्यान मनाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खरोखर मदत करते. ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते ज्यामुळे तणाव कमी होतो.
पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. एंडोर्फिनसारखे हार्मोन्स वाढतात ज्यामुळे मूड सुधारतो.
काही दिवस डिजिटल उपकरणांपासून ब्रेक घेतल्यास मन निरोगी आणि आनंदी राहते.
चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी छंद मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय करतात.
ताण - तणाव कमी करण्याकरता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. बाहेर फिरायला जा. चांगल्या लोकांमध्ये मिक्स व्हा. त्यांच्याशी मैत्री करा.