लसूण हा आयुर्वेदाच्यादृष्टीने महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो.



अधिक प्रमाणात लसूण खाल्ल्याने शरीराला त्रास उद्भवू शकतो.



लसणाचा प्रभाव हा गरम असतो, म्हणूनच लोक सर्दी आणि खोकला झाला असताना त्याच्या कळ्या चघळतात.



पण काही लोक जास्तच लसूण खातात त्यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ लागते.



लसूण मर्यादित प्रमाणात खाल्ला पाहिजे. अन्यथा विविध समस्या भेडसावू शकतात. जास्त लसूण खाल्ल्यास पोटात गरम पडू शकते.



ज्यांना रक्तदाबाचा (Low Blood Pressure) आजार आहे, त्यांनी लसूण खाऊ नये. कमी रक्तदाब (Low Blood Pressure) म्हणजेच हायपोटेन्शनची तक्रार असू शकते.



मुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा येऊ लागतो. त्यामुळे लसूण खाणे थोडे टाळा.



लसूण जास्त खाल्ल्यास छातीत जळजळ होण्याची तक्रार वाढू शकते. लसणात अ‍ॅसिडीक कंपाऊंड खूप जास्त असतात



याचे अधिक सेवन केल्याने छातीत जळजळ होते. कधीकधी ते सहनशक्तीच्या बाहेर देखील जाऊ शकते.



त्यामुळे जेवणात लसूण वापरताना नेहमी काळजी घ्या.