अनेकदा आपण ब्रेडसह इतर अनेक गोष्टी जास्त काळ टिकाव्यात म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो.
फ्रिजमध्ये अनेक पदार्थ दिर्घकाळ टिकून राहतात असं आपल्याला वाटतं.
यासाठी रोजच्या वापरावत वापरला जाणारा ब्रेडही खराब होऊ नये म्हणून आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवतो.
मात्र, ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्याची चव किंवा पोत खराब करतात.
खरंतर, ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण तो खोलीच्या तपमानावर योग्य राहील अशा प्रकारे तयार केला जातो.
याचंच कारण आहे की, दुकानातून ब्रेड विकत घेताना तो काऊंटरवर ठेवला जातो.
कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये, दुकानात, किंवा हॉटेलात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कुठेही ब्रेड फ्रिजमध्ये ठेवलेला दिसणार नाही.
ब्रेडमधील सॉफ्टनेस फ्रिजमध्ये ठेवल्याने कमी होतो.
तसेच, कोणताही ब्रेड विकत घेताना त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे ती तारीख बघूनच तो विकत घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.