लिंबू पाण्याचं अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. लिंबू वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. पण, लिंबाच्या पाण्याचे जास्त सेव आरोग्यासाठी घातक आहे. ॲसिडीक गुणधर्मांमुळे लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्यास दातांचे आरोग्य बिघडून दात खराब होतात. जास्त लिंबू पाणी प्यायल्यास पोटाचे आरोग्य बिघडून पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. तोंडात अल्सर झाला असल्यास लिंबू पाणी प्यायल्यास त्रास होऊ शकतो. जास्त लिंबू पाणी प्यायल्यामुळे ॲसिडिटी होऊन छातीत जळजळ होण्याची समस्या जाणवू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.