काही लोकांना दिवसातून तीन-चार कप कॉफी प्यायची सवय असते. कॉफी प्यायल्यानं झोप जाते, असे अनेकांचे मत आहे.

जर तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्हाला काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल.

सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (स्ट्रेस हार्मोन) ची पातळी वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन, वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो.

शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते.

सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी 2 ते 3 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यानंतर तुम्ही कॉफी किंवा चहा काहीही पिऊ शकता.

कॉफीमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते. वर्क आऊट करताना जर तुम्हाला कॅलोरी बर्न करायचे असतील, तर तुम्हाला कॉफी प्ययल्याने ऊर्जा मिळेल.