टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनयाने घराघरात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाच्या दुनियेत आपले अढळ स्थान निर्माण केल्यानंतर आता श्वेताचा सोशल मीडियावरही बोलबाला आहे.
वयाच्या 40व्या वर्षीही श्वेता तिवारी एकदम फिट दिसत आहे. ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. श्वेताचे फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
श्वेताने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केले आहे. काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. श्वेताचे फोटो पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येणार नाही.
फोटो शेअर करत श्वेताने लिहिले की, प्रत्येक रंगाची स्वतःची भाषा असते. फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. काही मिनिटांतच हजारो लोकांनी त्याचे फोटो लाईक केले आहेत.
सेलेब्स आणि चाहते श्वेताच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. सृष्टी रोडे हिने एक फायर इमोजी पोस्ट केला आहे. तर, रती पांडेने लिहिले – एव्हरग्रीन दिवा.
त्याचबरोबर श्वेताच्या या फोटोंवरून तिच्या चाहत्यांचीही नजर हटत नाहीय. या फोटोंवर भरभरून कमेंट केल्या जात आहेत.
श्वेताची स्टाईल पाहून असं म्हणता येईल की, ती या वयातही तिची मुलगी पलक तिवारीला तगडी स्पर्धा देत आहे. श्वेताचे हे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. (All PC : @ shweta.tiwari/IG)