बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



आलिया गेली काही दिवस तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो शेअर करत आहे.



नुकतेच आलियानं शेअर केलेल्या खास लूकमधील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



पिंक कलरची फ्लोरल प्रिंट असलेली साडी, कानामध्ये ऑक्साइडचे झुमके आणि केसांमध्ये पांढऱ्या रंगाचा गुलाब अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले.



आलियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



25 फेब्रुवारी रोजी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये आलियासोबतच अजय देवगन आणि विजय राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.



संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.