टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अडचणीत आली आहे.
भोपाळमध्ये एका वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने देवाचे नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.
वेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.
श्वेतावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून सूचना मिळाल्या आहेत. ही बाब आमच्या निदर्शनासही आली आहे. त्यावर काय कारवाई करता येईल, याचा तपास सुरू आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करता येईल.
फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या तयारी आणि प्रमोशनसाठी श्वेता 26 जानेवारीला प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती.