अभिनेत्री श्रुती हासन ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे श्रुती चर्चेत असते.



श्रुतीनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.



श्रुतीनं तिला झालेल्या आजाराची माहिती पोस्टद्वारे दिली आहे. सध्या श्रुतीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.



श्रुतीनं तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून तिच्या हेल्थबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.



PCOS (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) या आजाराचा सामना श्रुती करत आहे.



PCOS (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) या आजारावर मात करण्यासाठी ती योग्य आहार आणि शरीराला रेस्ट देणं या गोष्टींना फॉलो करत आहे, असं श्रुतीनं पोस्टमध्ये सांगितलं.



श्रुतीनं तिचा वर्क-आऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं PCOS बाबत सांगितलं.



PCOS मुळे हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात तसेच यामुळे ब्लोटिंगची समस्या जाणवते.



श्रुतीची पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.