अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते. नुकतेच तिने एक सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो तिने आता सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. सुंदर भरजरी साडी, मेकअप, साजेसे मोत्याचे दागिने, छोटीशी नथ आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रॉयल रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे हे सुंदर फोटो सारिका भांगे हिने आपल्या कॅमेरात टिपले आहेत. प्रार्थनाचं हे सुंदर रूप पाहून चाहते देखील तिच्या फोटोंवरून नजर हवू शकत नाहीयेत. पाह फोटो...