अभिनेत्री श्रिया सरन नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. श्रीया चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. श्रियाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोत ती लाल साडीमध्ये ग्लॅमरस स्टाईल दाखवताना दिसत आहे. फोटोत तिच्या केसात लाल गुलाब आणि भरगच्च मोठे कानातले दिसत आहे. तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे. तिच्या हजारो चाहत्यांनी तिचा फोटो लाईक केला आहे. श्रिया इंडियन आऊटफिट परिधान करणं पसंत आहे. अलीकडेच ती 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसली. ती सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.