नेहमीच फरफेक्ट राहणाऱ्या अभिनेत्री हिना खानने कमालीचा मेकअप केला आहे. हिनाने डोळ्यांना मेकअप केले असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिनाचा हा आईज् मेकअप चाहत्यांना देखील खूपच आवडला आहे. हिना खान डोळ्यांच्या मेकअपसाठी नेहमीच न्यूड आणि शिमरी शेड लावणे पसंत करते. सिल्वर हायलाईट्सने हिनाने आपला लूक सुंदर बनवलाय. या फोटोमध्ये हिनाने आयलिडवर ब्लू लाईनर लावले असून त्यावर आयलायटरने शेड केला आहे. हिनाने पिवळ्या रंगाचा आयशेडसह आऊट कॉर्नरवर ग्रीन शेड लावून सुंदर लूक कयार केलाय. न्यूड शेडसोबत खेळणे थोडे ट्रिकी होतं, परंतु, हिनाचा हा लूक एकदम क्लासी दिसत आहे. हिनाने ब्राऊन टच आय मेकअप केलाय. हिनाने लाईट पिंक आऊटशेडने आपला लूक पूर्ण केलाय. हिनाचा हा आय मेकअप कमालीचा सुंदर दिसत असून तिने पिंक रंगाच्या शिमरी आईशेडचा वापर केलाय. हिनाने या फोटोशूटमध्ये न्यूड आईजसोबत ब्लॅक आईजलाईनरचा वापर केलाय.