अंजली अरोरा ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री, मॉडेल, YouTuber आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील व्हिडिओ शेअर करते. तिनं बनवलेल्या रीलवर लाखो व्ह्यूज आणि लाईक्स येतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजलीचा जन्म पंजाबमध्ये झाला अंजलीचा आई-वडील,एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. तिच्या वडिलांचे नाव अश्विनी अरोरा आणि आईचे नाव बबिता अरोरा आहे. ती तिचा भाऊ अभिषेक अरोराच्या खूप क्लोज आहे, तिचं भावावर खूप प्रेम आहे. तिनं बनवलेला कच्चा बदाम या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाला. इंस्टाग्रामवर तिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.