बॅकलेस चोळी आणि व्हाईट साडी, तुम्हीही नक्की ट्राय करा अभिनेत्री श्रिया सरनचा ग्लॅमरस लूक
बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते.
तुम्हीही श्रियाची स्टाईल कॉपी करू शकता. साडी अनेक तरुणींचा आवडता लूक आहे.
प्रत्येक मुलीला साडीत सुंदर दिसण्याची इच्छा असते, त्यामुळे जर तुम्हालाही साडीमध्ये स्टायलिश दिसायचे असेल, तर बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनचा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता.
अभिनेत्री श्रियाप्रमाणे तुम्हीही हा ग्लॅमरस लूक कॅरी केल्यास प्रत्येकजण तुमच्या प्रेमात पडेल.
श्रियाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली असून तिच्यासोबत तिने डीप नेक बॅकलेस ब्लाउज घातला आहे.
अभिनेत्री श्रिया सरनची स्टाईल पाहून तुम्ही साडीमध्ये आकर्षक कसं दिसता येईल हे जाणून घेऊ शकता. अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलमुळेही चर्चेत असते.
या पांढऱ्या साडीसोबत लूक पूर्ण करण्यासाठी श्रियाने केस मोकळे सोडले आहेत.
श्रियाने मिनिमल मेकअप आणि न्यूड कलरची लिपस्किट लावली आहे. तसेच साडीसोबत मॅचिंग इअररिंग्स कॅरी केल्या आहेत.
उजव्या हातात डायमंड कडा आणि दुसऱ्या हातात सिंपल वॉच असा श्रिया सरनचा कंप्लिट लूक आहे.