हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.



अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका यांचा आज 57 वा वाढदिवस आहे.



अलका यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसेल. गायिका अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांनी 1989 मध्ये लग्न केलं. पण लग्न करुनही त्या नीरज यांच्यापासून 27 वर्ष दूर राहिल्या.



अलका यांची शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूर यांच्यासोबत एका रेल्वे स्टेशनवर ओळख झाली. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.



1988 मध्ये नीरज आणि अलका यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांच्या नात्याबाबत सांगितलं. दोघांच्या पालकांनी त्यांच्या नात्याला होकार दिला. 1989 मध्ये अलका आणि नीरज यांनी लग्नगाठ बांधली.



अलका याज्ञिक या 27 वर्षांपासून पती नीरजपासून वेगळ्या राहात आहेत. अलक या करिअरसाठी मुंबईत रहात आहेत तर नीरज हे शिलाँगमध्ये रहात आहेत



दोघांमध्ये वाद होत असल्यानं दोघे वेगळे राहतात, अशी चर्चा अनेकदा होते. पण अलका यांनी करिअरसाठी नीरज यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं.



अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली.



परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



अलका यांचा चाहता वर्ग मोठा आहे.