मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.
प्राजक्तानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं.
मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते अभिनेत्री हा प्राजक्ताचा प्रवास खडतर होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
झी-मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या स्ट्रगलबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मी पुण्याची असल्याने मला मुंबई शिफ्ट व्हावं लागलं. तेव्हा मुंबईत माझे नातेवाईक नव्हते. मुंबई नवी होती, कुटुंबाला सोडून राहणं देखील नवं होतं.'
'माझे कुटुंब लोअर मिडल क्लास होते. माझे वडील पोलीस खात्यात होते, त्यामुळे जेवढे पैसे आहे त्यातच सर्व अॅडजेस्ट करायचं, असं वातावरण घरात होतं. त्यावेळी लोकल ट्रेन तसेच मुंबई- पुण्याच्या मालगाडीतूनही मी प्रवास केला आहे.' असंही प्राजक्तानं सांगितलं.
पुढे प्राजक्तानं सांगितलं, 'मुंबईतील चित्रपटांच्या सेटवर वेगळं वातावरण होतं. चढाओढ, राजकारण, गॉसिप्स हा सर्व गोष्टी तिथे केल्या जात होत्या. या सर्वच बाबतीत संघर्ष होता. स्ट्रगल हा आजही सुरु आहे. '
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते.
लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.