'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. पांढरे जॅकेट, डेनिम जिन्स आणि गॉगल अशा एअरपोर्ट लूकमधील फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रेयाच्या या फोटोवर कुशल बद्रिकेने खास कमेंट केली आहे. कमेंटमध्ये कुशलने लिहीले, 'विमान किती वाजता आहे? कारण कॉल टाईम 12 चा होता, बाकी लूक मस्त आहे आणि तुला नेहमी प्रमाणे उशिर पण झाला आहे ' काही दिवसांपूर्वी श्रेयाने तिच्या जयपूर ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला तिने 'जयपूर नामा' असं कॅप्शन दिले होते. जयपूर ट्रिपमधील पती निखिल शेठसोबतचे काही रोमॅंटिक फोटो देखील श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते.