रुची सवर्णचं मॅटर्निटी फोटोशूट; पाहा खास फोटो कुमकुम भाग्य फेम रुची सवर्णने तिचा नवरा अंकित मोहनसोबत मॅटर्निटी फोटोशूट केलंय... रुची सवर्ण आणि पती अंकित मोहन आता आई-वडील होण्यासाठी सज्ज झाले आहेत रुचीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे खास फोटो शेअर केलेत फोटोंमध्ये रुची पिवळ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तर तिचा नवरा कॅज्युअलमध्ये स्मार्ट दिसतोय. हे जोडपे फार उत्साही दिसत आहे आणि त्यांच्या छोट्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. रुची तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय आहे ती तिच्या प्रेग्नेंसी वर्कआउट्स आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल पोस्ट करत असते रुची आणि अंकित यांचे 2 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते.