श्रावण महिन्यातील आज अखेरचा सोमवार आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा सध्या जोरात सुरु आहे. आज बीडच्या परळी वैद्यनाथ इथल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे देखील या वेळी सहभागी होते त्यानंतर तिथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यावेळी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक, पूजन करुन दर्शन घेतले आत्मिक समाधान आणि ऊर्जा मनात साठवून वैद्यनाथ चरणी प्रार्थना केली, असे पंकजा मुडे म्हणाल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या राज्यभर देवदर्शन दौरा करत आहेत. श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या यात्रेची सांगताही या ठिकाणी केली