बीडच्या वासनवाडीत मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वतःला गाडून घेतलं. मराठा आरक्षण आणि जालना येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलन सुरु आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांनी स्वतःला गाडून घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे. बीडच्या वासनवाडी ग्रामपंचायत समोर महिलांनी स्वतःला गाडून अनोखं आंदोलन केलं आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत सरकार आरक्षण देत नाही, असं महिलांचं म्हणणं आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा महिलांवर जालना येथे सरकारने लाठीचार्ज करायला लावला. त्यामुळे सरकारचा जाहीर निषेध करत या महिलांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत स्वतःला गाडून घेतलं आहे. मनोज जरांगे यांच्या आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणाला देखील या महिलांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने जर तात्काळ आरक्षण लागू नाही केलं तर, यापुढे देखील यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.