जवळपास दीड वर्षानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरने जाहीर केले आहे की तिची 'नागिन'साठी निवड करण्यात आली आहे. श्रद्धा कपूर सध्या अभिनेता रणबीर कपूरसोबत लव रंजनच्या C0 या सिनेमाचे शूटिंग करत आहे. C0 चे शूटिंग संपल्यानंतर लवकरच श्रद्धा नागिनचे शूटिंग सूरू करणार आहे. श्रद्धाने सांगितले की, श्रीदेवीचा 'नगीना' आणि 'निगाहैन' पाहून, तिची प्रशंसा आणि स्तुती करताना तिला अशाच भूमिका करायला आवडेल. दिग्दर्शक विशाल फुरियाने यापूर्वी दुसऱ्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, श्रद्धाला ही संकल्पना आवडली होती. श्रद्धाला नागिनची संकल्पना आवडल्यामुळे तिने यासाठी लगेच होकार दिला. फुरियाच्या मते, हे एक असामान्य पात्र आहे आणि त्यासाठी खूप तयारी करावी लागणार आहे. श्रद्धाकडे 'चालबाज इन लंडन' हा चित्रपट आहे. एप्रिल 2021 मध्ये 'चालबाज इन लंडन' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. निर्मात्यांनी 'चालबाज इन लंडन' चित्रपटाचे शूटिंक काळी काळासाठी थोबवले होते.