अभिनेता आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांपासून हे जोडपे वेगळे राहत आहेत. दोघांनीही त्यांचे वैवाहिक आयुष्याला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. रिपोर्ट्सनुसार दोघांनीही कायदेशीररित्या आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतात. इतकेच नाही तर इम्रानची पत्नी अवंतिकाने आपल्या लग्नाला आणि इम्रानला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला. दोघांमधील वाद संपुष्टात येत नाहीयेत. त्यामुळे आता या दोघांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने दोघांमधील नातेसंबंध सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र यात त्यांना यश आले नाही.