अभिषेक बच्चन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.



अनेक वेळा काही नेटकरी अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल करतात.



ट्रोलर्सला अभिषेक सडेतोड उत्तर देतो.



नुकतेच एक ट्वीट शेअर करुन एका युझरनं अभिषेकला ट्रोल केलं. या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला आहे.



लोक अजूनही वर्तमानपत्र वाचतात का? असं ट्वीट करुन एका युझरला अभिषेकनं विचारलं.



ट्वीटला रिप्लाय देत एका नेटकऱ्यानं अभिषेकला ट्रोल केलं. त्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, “शहाणे लोक वाचतात तुमच्यासारखे बेरोजगार नाहीत.



युझरला रिप्लाय देत अभिषेकनं लिहिलं, 'ओह, या माहितीसाठी धन्यवाद पण बुद्धी आणि रोजगार यांचा काहीही संबंध नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही नक्कीच काम करत असाल. पण तुमच्या ट्वीटमधून असं लक्षात येतं की तुमच्याकडे बुद्धी नाहीये.'



अभिषेकच्या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांना रिप्लाय दिला आहेत.



अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या अभिषेकच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.