मलायकाचा आज 49 वा वाढदिवस आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री मलायका आरोराचा आज 49 वा वाढदिवस आहे. 23 ऑगस्ट 1975 रोजी मलयाकाचा जन्म झाला. छैय्या छैय्या या गाण्यामुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. 1998 साली मलायकानं अरबाज खानसोबत लग्नगाठ बांधली. मलायका आणि अरबाजनं लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी मलायका आणि अरबाज जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा आहे. सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.