श्रद्धा कपूर तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. जाणून घेऊयात श्रद्धा कपूरचा डाएट आणि वर्क आऊट प्लॅन श्रद्धा नेहमी घरी तयार केलेले जेवण शूटिंग सेटवर आणते. तिला अंड, ग्रिल्ड फिश, फळं आणि पालेभाज्या खायला आवडतात. श्रद्धा सकाळी ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि उपमा खाते. तसेच तिला एग व्हाइट असणारं ऑम्लेट देखील खायला आवडतं. दुपरच्या जेवणात श्रद्धा पोळी, भाजी, भात,वरण आणि सॅलेड खाते. श्रद्धा रात्री आठ वाजता डिनर करते. रात्रीच्या जेवणात ती ग्रिल्ड फिश करी आणि ब्राऊस राइस खाते. श्रद्धा बर्निंग कार्डियो करते तसेच ती दररोज योगा देखील करते.