प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर दहशतवादी धोका लक्षात घेता, दिल्ली पोलिस संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंतच्या परेड मार्गाचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी जवळपास 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तर, राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज संध्याकाळी देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी अतुलनीय शौर्य दाखवून बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच यावर्षीही 2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.