लारा दत्ता का राहते चित्रपटांपासून दूर? जाणून घ्या त्या मागचे कारण..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. पण काही दिवसांपूर्वीच तिनं कमबॅक केला आहे.

मात्र, काही काळानंतर ती चित्रपटांपासून दूर राहू लागली. तिने स्वत: या मागचे कारण सांगितले आहे.

ती म्हणाली, 'मी 30 व्या वर्षात असताना मला अशा भूमिका मिळू लागल्या,

ज्यात मी एकतर कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी मैत्रीण असायची. या भूमिका मला इंडस्ट्रीत 10 वर्षे काम केल्यानंतर मिळू लागल्या.

लारा सांगते, तिला कॉमिक चित्रपट करताना जास्त आराम वाटतो. कारण अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये तिला या सर्व भूमिकांपेक्षा जास्त काम करण्याची संधी मिळते.

'हंड्रेड', 'हिकअप्स अँड हुकअप्स' आणि 'कौन बनेगी शिखरवती' यासारख्या वेब सीरिजमध्ये लारा दिसली आहे.

त्याआधी ती अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसली होती.

Thanks for Reading. UP NEXT

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कानाकोपऱ्यात फौजफाटा!

View next story