मृण्मयीने हटके लूकने वेधलं चाहत्यांचे लक्ष! मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. 'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. मृण्मयी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. या फोटोंमध्ये मृण्मयीने मोती रंगाची साडी नेसलीये. त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये मृण्मयी अतिशय सुंदर दिसत आहे. हा लूक तिने जुईली आणि रोहित राऊतच्या लग्नासाठी केला होता.