बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साधेपणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. श्रद्धा कपूर इंस्टाग्रामर खूप अॅक्टिव्ह असते. श्रद्धाने आता इंस्टाग्रामवर 75 मिलियनचा टप्पा पार केला आहे. श्रद्धाने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. श्रद्धाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या 12 वर्षांपासून श्रद्धा कपूर इंडस्ट्रीत आहे. 2010 साली 'तीन पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धाला लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत श्रद्धाने काम केलं आहे. लव रंजनच्या आगामी सिनेमात श्रद्धा रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.