'कांतारा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.



ऋषभ शेट्टी यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.



चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन करणाऱ्या रिषभ शेट्टीनं या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी रिषभनं चार कोटी मानधन घेतलं.



अभिनेत्री सप्तमी गौडानं कांतारा या चित्रपटात लीला ही भूमिका साकारली. सप्तमीनं या चित्रपटात काम करण्यासाठी 1.25 रुपये मानधन घेतलं आहे.



कांतारा चित्रपटात मुरलीधर या फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका अभिनेता किशोर यांनी साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी किशोर यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.



चित्रपटात देवेन्द्र सुत्तूरू ही भूमिका अच्युत कुमार यांनी साकारली आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 75 लाख मानधन घेतलं.



कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे.



कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे.



‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे.



कांतारा चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.