अभिनेता अभिषेक बच्चनची 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये अभिषेकनं डॉ. अविनाश सभरवाल ही भूमिका साकारली आहे.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चननं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीबाबत त्याचं मत व्यक्त केलं.



'जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले, तेव्हा लोक एक बटण दाबल्यानंतर काहीही पाहू शकत होते. ओटीटीवर तुम्ही प्रत्येक भाषेत शो पाहू शकता. ' असं अभिषेकनं सांगितलं.



पुढे अभिषेक म्हणाला, 'कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला तरी चांगला कंटेंट नेहमी लोकांना आवडेल. डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे कलेक्शन ऐवजी कंटेंटकडे लक्ष देतात'



'काही लोक कंटेंटपेक्षा कलेक्शन आणि पैशांबाबत जास्त विचार करतो.' असं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अभिषेकनं सांगितलं.



अभिषेकनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' या आगामी वेब सीरिजबाबत देखील सांगितलं, 'या सीरिजला एग्जिक्युट करणं खूप अवघड होते कारण ही थ्रिलर वेब सीरिज आहे'



ब्रीद: इनटू द शॅडो -2 ही सीरिज 9 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होणार आहे.



अभिषेकसोबतच नवीन कस्तूरिया आणि सैयामी खेर हे कलाकार या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.



अभिषेकच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.