शक्ती कपूर यांची लेक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.
श्रद्धाने ही कार स्वत:लाच भेट केली आहे. अभिनेत्री कारची शौकीन आहे.
आता तिच्या कार कलेक्शनमध्ये'रोसो एंटेरोस लॅम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निका' गाडीचा समावेश झाला आहे.
अभिनेत्रीचे कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रद्धाने घेतलेल्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे.
ऑटोटेक पोर्टलनुसार, याआधी श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती. तिची किंमत 2.46 कोटी रुपये होती.
त्यापूर्वी अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई होती. त्या गाडीची किंमत 1.01 कोटी रुपये होती.
आता 'स्त्री 2' या आगामी सिनेमात ती झळकणार आहे.
या सिनेमात राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसेल.