श्रद्धा आर्याचा व्हिडिओ व्हायरल; तासाभरात तीन लाखांहून अधिक व्ह्यूज



छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या मालदीवमध्ये पती राहुल नागलसोबत हनीमून एन्जॉय करत आहे.



श्रद्धा आर्या हिने 16 नोव्हेंबरला राहुल नागलसोबत लग्नगाठ बांधली.



लग्नानंतर लगेचच श्रद्धा तिच्या 'कुंडली भाग्य' या शोच्या शूटिंगसाठी दिल्लीहून मुंबईला परतली होती.



नुकतेच हे कपल हनीमूनसाठी मालदिवला रवाना झाले आहे.



आता श्रद्धाचा तिच्या हनीमून व्हेकेशनमधील सिझलिंग बिकिनी अवतार समोर आला आहे.



श्रद्धाने मालदिव मधील एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धाने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.



ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. इतकंच नाही तर श्रद्धा पूलच्या बाजूला गाण्यावर थिरकताना दिसत आहे.



श्रद्धाने काही तासांपूर्वी तिचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओ इतक्या कमी वेळात तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



श्रद्धाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.