डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत.



रोज रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी

एक चमचा बडीशेप (सौफ), दोन बदाम आणि अर्धा चमचा साखर एकत्रित करुन वाटून घ्यावं. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे

3-4 हिरव्या वेलच्या, एक चमचा बडीशेप (सौफ) सोबत वाटून घ्याव्या. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे



ग्रीन टी दिवसातून रोज 2 ते 3 वेळा प्यावा, यातील अॅन्टीऑक्सिडेंटस डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात.

दिवसातून दोनवेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा, याने नजर चांगली होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.